लातूर - पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
लातूर, 17 मे, (हिं.स.)। लातूर शहरातील बोधे नगर परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. खेळता खेळता पाण्याच्या डबक्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर येथील रामला इंडस्ट्रीजच्
बुडून मृत्यू


लातूर, 17 मे, (हिं.स.)। लातूर शहरातील बोधे नगर परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. खेळता खेळता पाण्याच्या डबक्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील भागात टँकरसाठी पाणी साठविण्यात येणाऱ्या डबक्याजवळ काही मुले खेळत होती. यावेळी दिव्या नवनाथ उबाळे (वय ६) आणि कार्तिक भरत कांबळे (वय ७) हे दोघे पाण्यात पडल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांनाही बाहेर काढले आणि उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

या घटनेमुळे बोधे नगर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शहरातील धोकादायक पाणीसाठे, उघडी डबकी आणि सुरक्षाव्यवस्था नसलेल्या ठिकाणांबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande