मोहोळ तालुक्यात भीषण घटना; १०० वासरांपैकी २१ जनावरे दगावली
सोलापूर, 17 मे (हिं.स.)। मोहोळ तालुक्यातील वाळूज गावाजवळ जनावरांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमध्ये कोंबून भरलेल्या २१ जनावरांचा जागीच मृत्यू झाला असून काही जनावरे जखमी अवस्थेत सैरावैरा धावत असल्याचे चित्र समोर आले आ
मोहोळ तालुक्यात भीषण घटना; १०० वासरांपैकी २१ जनावरे दगावली


सोलापूर, 17 मे (हिं.स.)।

मोहोळ तालुक्यातील वाळूज गावाजवळ जनावरांनी भरलेला ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमध्ये कोंबून भरलेल्या २१ जनावरांचा जागीच मृत्यू झाला असून काही जनावरे जखमी अवस्थेत सैरावैरा धावत असल्याचे चित्र समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळहून एमएच ११ एएल ३१५९ क्रमांकाच्या ट्रकमधून धाराशिवकडे कत्तलीसाठी जनावरे नेली जात होती. मोहोळ तालुक्यातील वाळूज गावाजवळील घाडगे वस्ती परिसरात भरधाव वेगातील ट्रक अचानक पलटी झाला.

या ट्रकमध्ये सुमारे १०० वासरे भरलेली होती. त्यापैकी २० वासरांचा आणि एका गायीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जिवंत राहिलेली काही जनावरे घाबरून सैरावैरा पळत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी जनावरांना उपचारासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande