
कोल्हापूर, 17 मे (हिं.स.)। शिरोली पुलाची, ता. हातकणंगले
येथील सर्वेश्वर कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने ७० किलो वजनी गट 'महासंग्राम' लीग कबड्डी स्पर्धेचे उदघाटन हातकणंगले विधानसभा मतदार संघांचे आ. अशोकराव माने यांचे हस्ते, शिरोली जि. प. सदस्य सलीम महात, संयोजक अध्यक्ष संभाजी भोसले, माजी. जि. प. सदस्य महेश चव्हाण, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. संभाजी पाटील उपसरपंच विजय जाधव, तंटामुक्ती समिती सदस्य सतिश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पहिल्या दिवशी सिद्धांत वॉर, आर आर किंग, शिवशाही इलेक्ट्रीकल्स, शिवसुत्र तालीम या संघांनी विजयी सलामी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर कोल्हापूर जिल्हा कब्बड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सुरु झालेल्या स्पर्धेत सर्वेश्वर योद्धा, शिवमुद्रा रोहीदास, शिवसाई इलेक्ट्रीक इलेक्ट्रीकल्स, बाळूमामा चॅम्पीयन, सिद्धांत वॉर टॅकल्स, आर आर किंग, थ्री वॉरीयर्स, शिवसुत्र तालीम असे. प्रयोजक असलेले आठ संघ उतरले आहेत.
सर्वेश्वर मंडळाचे अध्यक्ष राजाराम सावंत, उपाध्यक्ष गजानन कौंदाडे व अमर जाधव, उद्योजक संतोष बाटे, संग्राम कदम, उदय पाटील आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar