सातारा - अधिक मासानिमित्त मुरलीधर मंदिरात विशेष सजावट
सातारा, 17 मे (हिं.स.)। येथील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधू यांच्या श्री मुरलीधर मंदिरामध्ये अधिक मासानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक मासानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच प्रांगणात विशेष विद्युत रोषणाई तसेच विविध फुले ,
सातारा


सातारा, 17 मे (हिं.स.)। येथील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधू यांच्या श्री मुरलीधर मंदिरामध्ये अधिक मासानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक मासानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच प्रांगणात विशेष विद्युत रोषणाई तसेच विविध फुले ,पाने आणि पताकाची सजावट लक्ष वेधून घेत आहे .दरम्यान 15 जून पर्यंत संपन्न होणाऱ्या या अधिकमास म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये विविध धार्मिक उपक्रम जप, पूजा आधी कार्यक्रमांनी रेलचेल असणार आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात यावर्षीच्या ज्येष्ठ अधिकमासामध्ये असे विविध उपक्रम साजरे होणार आहेत .या वर्षी अधिक ज्येष्ठ मास असून, हा कालावधी अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो.

अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असून, या काळात केलेली पूजा, जप, दान, उपवास आणि सेवा शतपटीने फळ देणारी मानली जाते.वसिष्ठ सिद्धांतानुसार अधिक महिना हा साधारणतः ३२ महिने १६ दिवस ८ तासांनी, म्हणजे जवळपास ३३ महिन्यांनी येतो. म्हणूनच अधिक मासात ३३ वस्तूंचे दान, ३३ अनारसे किंवा ३०+३ अशी परंपरा सांगितली जाते.

पूर्ण महिना ३० दिवसांचा असल्याने, एखादे व्रत किंवा नेम दिवसातून एकदा करत असल्यास शेवटचे ३ दिवस ते दोन वेळा करून ३३ पूर्ण केले जातात.

तसेच ३३ कोटी देवता असल्यानेही ३३ या संख्येला विशेष महत्त्व आहे.

अधिक मासात करावे ..भगवान विष्णूंची पूजा ,नामस्मरण व जप ,दानधर्म ,उपवास ,भागवत कथा श्रवण ,दीपदान ,गोसेवा पुरुषोत्तम याग / विष्णू याग / लक्ष्मी नारायण याग/ सत्यनारायण महापुजा करावे

या काळात लग्न, गृहप्रवेश यांसारखी शुभकार्ये निषिद्ध मानली जातात.सामान्य कौटुंबिक साधकाने अधिक मास हा एक उपासना, विष्णू व दत्त सेवेची पर्वणी मानून श्री चरणी खालील सेवा अर्पण करून शतपटीने पुण्यसंचय करावा. अधिक मासात करावयाच्या सेवा ,घरात असलेल्या विष्णू मूर्ती, फोटो किंवा श्रीकृष्ण-दत्तांच्या प्रतिमेला रोज हार अर्पण करावा व शांतपणे मानसपूजा करावी.रोज किमान एक माळ..ॐ नमो भगवते वासुदेवाय”या मंत्राचा जप करावा.हा जप स्नानानंतर सकाळी करावा. न जमल्यास दिवसभरात केव्हाही करू शकता.गोपालकृष्णास रोज लोणी-साखरेचा नैवेद्य महिनाभर दाखवावा.रोज किमान एकदा विष्णुसहस्रनाम म्हणावे किंवा श्रवण करावे.रोज गोपालकृष्णाला तुलसीपत्र अर्पण करावे. रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा.तसेच तिळाच्या तेलाचा अखंड नंदादीप समयी स्वरूपात लावावा. दत्त मंदिर किंवा कृष्ण मंदिरात दीपासाठी तेल, तूप किंवा त्या स्वरूप पैसे दान द्यावेत.अधिक मासात गुरुजींना अन्न, फळे, वस्त्र व दक्षिणा अर्पण करून आशीर्वाद घ्यावेत. दत्तक्षेत्री चालणाऱ्या अन्नदानासाठी पैसे किंवा वस्तूरूपात देणगी अर्पण करावी.विद्यार्थी, गरीब किंवा निराधार कुटुंबांना सर्वतोपरी मदत करावी. या पवित्र महिन्यात आपल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार शक्य ती सेवा अवश्य करा.

सातारा शहरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिरातही पुरुषोत्तम मासानिमित्त विशेष पुरुषोत्तम यागाचे आयोजन करण्यात आले असून संबंधितांनी मंदिर ट्रस्टकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहेत .त्यासाठी संपूर्ण देशातील हिंदू बांधवांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande