अमरावती जिल्ह्यात लागले २० टॅंकर ; पाणीटंचाई वाढली ; १७ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण
अमरावती, 18 मे (हिं.स.) अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईची धग वाढली असून चिखलदरा तालुक्यातील आठ गावांना २० टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. १७ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांना पाणीपुरवठा केल्या जात आहे. टंचाईची तीव्रता येत्या
अमरावती जिल्ह्यात लागले २० टॅंकर ; पाणीटंचाई वाढली ; १७ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण


अमरावती, 18 मे (हिं.स.) अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईची धग वाढली असून चिखलदरा तालुक्यातील आठ गावांना २० टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. १७ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांना पाणीपुरवठा केल्या जात आहे. टंचाईची तीव्रता येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे.

एप्रिलमध्ये तापमानवाढी सोबतच पाणीटंचाईची तीव्रतासुद्धा वाढली आहे. चिखलदरा तालुक्यातील २५० पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाई भेडसावत असून टॅंकरची गावे वाढत चालली आहेत. विशेष म्हणजे, या आठवड्यात पुन्हा काही गावांना टॅंकर लागण्याची शक्यता आहे.शिवाय खासगी विहिरींचे अधिग्रहणसुद्धा होणार आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच टॅंकर सुरू झाले. एप्रिलच्या मध्यावर आठ गावांत २० टॅंकर लागले आहेत, तर दररोज विहिरींचे अधिग्रहण होत आहे.

येत्या आठवड्यात टॅंकरवर अवलंबिणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी चिखलदरा तालुक्यातील १९ गावांना जुलै व ऑगस्टपर्यंत टॅंकर सुरू होते. यंदासुद्धा अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

कायमस्वरुपी उपाययोजनाच नाहीत

मेळघाटात जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पाणीटंचाईची धग कायम आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत नसल्याने दर उन्हाळ्यात हीच स्थिती कायम आहे.

या गावात लागले टॅंकर

मोथा ः तीन, खडीमल ः सहा, गौलखेडा बाजार ः दोन, बहाद्दरपूर ः एक, आकी ः एक, मेहरियम ः दोन, आलाडोह (शहापूर) ः दोन, आलाडोह ः दोन, गवळीढाणा ः एक

या गावांत विहिरींचे अधिग्रहण

यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्नेहा धावडे म्हणाल्या की,

मोथा, खडीमल, गौलखेडा बाजार, बहाद्दरपूर, आकी, मेहरियम, आलाडोह, शहापूर, गवळीढाणा, खुदावनपूर, चूनखडी, आवागड, वस्तापूर, कामिदा, बामादेही, चुरणी, लवादा.जिल्ह्यातील ज्या गावांना आवश्यकता आहे त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या सोबतच काही ठिकाणी उपाययोजना सुद्धा सुरू आहेत. गरज आहे त्या ठिकाणी टँकरचे प्रश्ताव मागविण्यात आल आहे.

जिल्ह्यात ४५ टक्के जलसाठा

वाढत्या तापमानाने सिंचन प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने घसरू लागला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात ४८१ दलघमी साठा शिल्लक असून एकूण जलसंचाय पातळीच्या तो सरासरीने ४५ टक्के आहे. सर्वात मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पात २८० दलघमी साठा आहे. या धरणावर अमरावती शहरासह ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तर सात मध्यम प्रकल्पात ११३ दलघमी साठा असून यातील गडगा प्रकल्प कोरडा पडला आहे तर बोर्डीनाला प्रकल्पात केवळ ०.३५ दलघमी जलसाठा आहे. जिल्ह्यात ४८ लघूप्रकल्प असून त्यामधील जलसाठ्याची स्थिती फार चांगली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande