
नांदेड, 18 मे (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत अनुसया मंगल कार्यालय, नांदेड येथे भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान वर्ग यशस्वीरीत्या संपन्न झाला.
त्यानंतर “भारतीय जनता पार्टी पक्षाची कार्यपद्धती” या महत्त्वपूर्ण विषयावर पदाधिकाऱ्यांसोबत सखोल संवाद साधत मार्गदर्शन केले. या संवादातून संघटनात्मक बांधणी, कार्यपद्धतीतील शिस्त आणि जनतेशी प्रभावी संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन संघटन अधिक सक्षम व बळकट करण्याची प्रेरणा मिळाली.असे त्यांनी सांगितले
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis