
बीड, 18 मे (हिं.स.) : बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नांदुरगाट, ता. केज येथे विविध कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहून पंचक्रोशीतील ग्रामस्थांशी संवाद साधला.
या वेळी ग्रामस्थांनी मांडलेल्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि विकासात्मक समस्या व अडचणी ऐकून घेत त्यावर सकारात्मक व प्रभावी उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पक्षप्रवेशामुळे संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश केला.
तसेच खासदार सोनवणे यांनी माजी पंचायत समिती सभापती तारळकर तात्या यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन विविध राजकीय, सामाजिक व स्थानिक विकासाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या दौऱ्यात स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला असून, ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी पुढील काळात सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis