वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणुकीची घोषणा; आचारसंहिता लागू
चंद्रपूर, 18 मे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही सार्वत्रिक निवडणूक होत असून, 18 मे 2026 पा
संग्रहित लोगो


चंद्रपूर, 18 मे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही सार्वत्रिक निवडणूक होत असून, 18 मे 2026 पासून संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघाचाही समावेश आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अधिसूचनेची प्रसिद्धी : 25 मे 2026

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख : 1 जून 2026

नामनिर्देशनपत्र छाननी: 2 जून 2026

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 4 जून 2026

मतदान दिनांक : 18 जून 2026

मतदानाची वेळ : सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत

मतमोजणी : 22 जून 2026

निवडणूक प्रक्रिया समाप्ती : 25 जून 2026

या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेत वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील 40 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 977 पात्र मतदार मतपत्रिकेद्वारे मतदान करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी दिली आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande