कन्नड शहर येथे अद्ययावत सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अंतर्गत खुलताबाद, वेरूळ, घृष्णेश्वर आणि कन्नड शहर येथे अद्ययावत सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारी प्रतिबंधासाठी हा प्रकल्
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अंतर्गत खुलताबाद, वेरूळ, घृष्णेश्वर आणि कन्नड शहर येथे अद्ययावत सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारी प्रतिबंधासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांद्वारे या भागातील प्रमुख चौक, बाजारपेठा, धार्मिक स्थळे व रस्त्यांवर २४ तास नजर ठेवणे शक्य होणार आहे. विशेषतः जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर परिसरात येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे, गुन्ह्यांचा तपास जलद करणे तसेच महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होणार आहे. पोलीस नियंत्रण कक्षाशी थेट जोडलेल्या या यंत्रणेमुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande