मंत्री अतुल सावे यांनी दिली गांधेली येथील दुग्धशाळा व अत्याधुनिक प्रक्रिया केंद्रास भेट
छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.)। दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनीछत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (देवगिरी), गांधेली येथील दुग्धशाळा व अत्याधुनिक प्रक्रिया केंद्रास भेट देत विविध विभागांची पाहणी केली. दूध संकलन, प्रक्रिय
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.)। दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनीछत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (देवगिरी), गांधेली येथील दुग्धशाळा व अत्याधुनिक प्रक्रिया केंद्रास भेट देत विविध विभागांची पाहणी केली.

दूध संकलन, प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी, शीतसाखळी व्यवस्था तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या दुग्धजन्य उत्पादनांची माहिती घेतली. ग्रामीण भागातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यात अशा सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम, आधुनिक आणि शेतकरी केंद्रित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. दूध उत्पादकांना योग्य दर, आधुनिक सुविधा आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande