रायगड जिल्ह्यातील ७ शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
रायगड, 18 मे (हिं.स.)। जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सात शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरीब, हुशार, होतकरू तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार
जिल्ह्यातील ७ शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू  रायगड जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सात शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरीब, हुशार, होतकरू तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग यांनी दिली.  जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह महाड, तळा आणि अलिबाग येथे कार्यरत आहेत. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींची शासकीय वसतिगृहे महाड, पनवेल, अलिबाग आणि पाली-सुधागड येथे सुरू आहेत.  शासन निर्णयानुसार प्रवेशासाठी अनुसूचित जातींसाठी ८५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के, अनुसूचित जमातींसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के तसेच आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी ५ टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.  या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन सुविधा देण्यात येणार आहे. तसेच वह्या, पुस्तके आणि लेखन साहित्य खरेदीसाठी ४ हजार रुपयांपर्यंत भत्ता, जिल्हा स्तरावर दरमहा १३०० रुपये तर तालुका स्तरावर १००० रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. याशिवाय गणवेश, प्रोजेक्ट रिपोर्ट, शैक्षणिक सहल आणि अॅप्रन भत्त्याचाही लाभ मिळणार आहे.  प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती-जमातींसाठी २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी, तर इतर मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.  अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, गुणपत्रक, बँक खाते व आधार कार्डची प्रत जोडणे बंधनकारक असून अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृह किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी केले आहे.


रायगड, 18 मे (हिं.स.)। जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सात शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरीब, हुशार, होतकरू तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग यांनी दिली.

जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह महाड, तळा आणि अलिबाग येथे कार्यरत आहेत. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींची शासकीय वसतिगृहे महाड, पनवेल, अलिबाग आणि पाली-सुधागड येथे सुरू आहेत.

शासन निर्णयानुसार प्रवेशासाठी अनुसूचित जातींसाठी ८५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के, अनुसूचित जमातींसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के तसेच आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी ५ टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन सुविधा देण्यात येणार आहे. तसेच वह्या, पुस्तके आणि लेखन साहित्य खरेदीसाठी ४ हजार रुपयांपर्यंत भत्ता, जिल्हा स्तरावर दरमहा १३०० रुपये तर तालुका स्तरावर १००० रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. याशिवाय गणवेश, प्रोजेक्ट रिपोर्ट, शैक्षणिक सहल आणि अॅप्रन भत्त्याचाही लाभ मिळणार आहे.

प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती-जमातींसाठी २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी, तर इतर मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, गुणपत्रक, बँक खाते व आधार कार्डची प्रत जोडणे बंधनकारक असून अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृह किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande