महाराष्ट्रात हँडबॉलच्या विकासासाठी व्यापक नियोजनाची गरज -अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.) : महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनची सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडली. या सभेला पदाधिकारी, प्रशिक्षक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.) : महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनची सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडली. या सभेला पदाधिकारी, प्रशिक्षक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात हँडबॉल खेळ अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

नवोदित खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धांचे प्रभावी नियोजन करणे, महिला खेळाडूंना अधिक संधी निर्माण करणे तसेच राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची कामगिरी अधिक भक्कम करण्याबाबत सभेत सकारात्मक विचारमंथन झाल्याचे त्यांनी सांगितले.

खेळाडूंना दर्जेदार मैदान, प्रशिक्षक आणि आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात आल्याचेही मंत्री सावे यांनी नमूद केले.

सभेदरम्यान राज्यातील हँडबॉलच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande