अधिक मासानिमित्त परळीत हरिनाम सप्ताहाला सुरुवात
बीड, 18 मे (हिं.स.)। परळी येथील संत जगमित्र नागा मंदिरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा संत तुकाराम महाराज गाथा पारायणाला सुरुवात झाली. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त परळी शहराच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी व माजी नगरा
अधिक मासानिमित्त परळीत हरिनाम सप्ताहाला सुरुवात


बीड, 18 मे (हिं.स.)। परळी येथील संत जगमित्र नागा मंदिरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा संत तुकाराम महाराज गाथा पारायणाला सुरुवात झाली. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त परळी शहराच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी व माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्ताहात राम महाराज, विश्वनाथ महाराज घोडके, सचिन महाराज गित्ते, संजय महाराज तांबडे, कृष्णा महाराज गुट्टे, प्रा. श्याम महाराज नेरकर तसेच पुजेचे कीर्तन अॅड. दत्तात्रय महाराज आंधळे तर काल्याचे कीर्तन संदीपान महाराज हसेगावकर यांचे होणार आहे. अनेक मान्यवरांची कीर्तने होणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांचा सत्कार निर्गुण मुंडे यांच्या हस्ते तर माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांचा सत्कार शिवरत्न मुंडे यांनी केला. याप्रसंगी ज्ञानोबा माऊली रूमनेकर, प्रा. श्याम महाराज नेरकर, वसंत गीत्ते, रघुनाथ बोले, अंगद महाराज हिंगणीकर, फुलचंद मुंडे, उदय पुजारी, औटी, जीवन शिंदे, सुरेश गीत्ते महाराज आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande