तापमान वाढीचे दूरगामी परिणाम; जलस्रोत आटले, निसर्ग रुक्ष
बीड, 18 मे (हिं.स.)। मे महिना अखेरीस येत असतानाच अंबाजोगाई परिसरात उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून सूर्य जणू आग ओकत आहे. या वाढत्या भीषण तापमानाचा मोठा फटका स्थानिक निसर्गाला आणि वन्यजीवांना बसला आहे. येथील ऐतिहासिक मुकुंदराज स्वामी महाराज मंदिर
तापमान वाढीचे दूरगामी परिणाम; जलस्रोत आटले, निसर्ग रुक्ष


बीड, 18 मे (हिं.स.)।

मे महिना अखेरीस

येत असतानाच अंबाजोगाई परिसरात उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून सूर्य जणू आग ओकत आहे. या वाढत्या भीषण तापमानाचा मोठा फटका स्थानिक निसर्गाला आणि वन्यजीवांना बसला आहे. येथील ऐतिहासिक मुकुंदराज स्वामी महाराज मंदिर परिसरातील जनजीवन व निसर्ग पूर्णपणे होरपळला आहे.

मुकुंदराज मंदिर परिसरात वर्षभर खळखळून वाहणारे नदी-नाले आणि पाण्याचे झरे या कडक उन्हामुळे पूर्णपणे कोरडे पडले

आहेत. उन्हाच्या तीव्र आणि उष्ण झळांमुळे नेहमी किलबिलाटाने गजबजणारा पक्ष्यांचा वावर आता थांबला असून, दुपारच्या वेळी परिसरात शांतता पसरत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत हिरवळीने नटलेले येथील डोंगरकडे आता पूर्णपणे रुक्ष आणि करपलेले दिसत आहेत. उन्हाची तीव्रता एवढी भीषश आहे की, परिसरातील नेहमी हिरवीगार राहणारी अनेक झाडे आता वाळून चालल्याचे पाहायला मिळत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीव आणि पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande