खादी व ग्रामोद्योग मंडळाचे ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कार जाहीर
रायगड, 18 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने देण्यात येणारे ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून जागतिक मधमाशी दिनानिमित्त २० मे रोजी संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार आहे. राज्या
khadi


रायगड, 18 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने देण्यात येणारे ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून जागतिक मधमाशी दिनानिमित्त २० मे रोजी संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार आहे.

राज्यात मधमाशीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे तसेच मधपाळांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०२३ पासून या पुरस्कार योजनेची सुरुवात केली आहे. २०२६ वर्षासाठी विविध जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपाळांची निवड करण्यात आली आहे.यंदाच्या ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारासाठी लातूर येथील ज्ञानेश्वर मलीले, संभाजीनगर येथील गणेश बुरकुल, बुलढाणा येथील राजेंद्रदास बैरागी आणि पुणे येथील श्वेता वायाळ यांची निवड करण्यात आली आहे.तसेच विशेष सन्मानासाठी ठाणे येथील चंद्रकांत तरे, पुणे येथील संजय मारणे, कोल्हापूर येथील दयावान पाटील आणि जळगाव येथील विद्यानंद आहिरे यांची निवड करण्यात आली आहे.पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे असून मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या माध्यमातून गौरविण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande