लासलगावला कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांसमवेत आमदार रोहित पवारांचे आंदोलन
ट्रॅक्टर मोर्चा काढत कांदा - भाकरी खाऊन सरकारला दिला इशारा लासलगाव, 18 मे (हिं.स.)। - संपूर्ण जगामध्ये कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्येच सर्वात कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्य
MLA Rohit Pawar's protest


ट्रॅक्टर मोर्चा काढत कांदा - भाकरी खाऊन सरकारला दिला इशारा

लासलगाव, 18 मे (हिं.स.)।

- संपूर्ण जगामध्ये कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्येच सर्वात कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यातील संघर्ष सुरू झाला असून यामुळे वातावरण चांगलेच कापले आहे अशामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे नेते आमदार रोहित पवार यांनी नाशिक मध्ये लासलगाव या ठिकाणी शेतकऱ्यांसमवेत आंदोलन केले आहे. यामुळे आता कांदा प्रश्नावरून सरकार आणि शेतकरी यांच्यातील संघर्षाला अधिकच धार चढली आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचा उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांना तर कवडीमोल भावात कांदा विकल्यानंतर त्यातून वाहतूक भाडेही न निघाल्याने ते खिशातून देण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत कांद्याला भाव देण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढून आणि रस्त्यावर ठिय्या देत कांदा-भाकर खाऊन आंदोलन करत सरकारचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले.कांद्याचा उत्पादन खर्च किलोमागे १७ ते २० रुपये असताना खरेदीचा भाव साडेबारा रुपये असेल, तर हा शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे. त्यामुळे सरकारने नाफेडऐवजी २५ रु. किलोप्रमाणे बाजार समितीतच शेतकऱ्यांकडील सर्व कांद्याची खरेदी करावी आणि यापूर्वी मातीमोल भावात कांदा विकण्यात आलेल्या शेतकऱ्यांना किलोमागे १५ ते २० रुपये अनुदान देण्याची मागणी आमदार रोहित पवारांनी केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश बघता सरकार यावर तातडीने निर्णय घेईल, ही अपेक्षा अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन उभारलं जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी. असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला.

यावेळी खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके, सुनील भुसारा, माणिकराव शिंदे, लासलगाव बाजार समिती उपसभापती संदीप दरेकर, संचालक जयदत्त होळकर यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) नितीन आहेर, निफाड पूर्व तालुका प्रमुख शिवा सुराशे, निफाड तालुका प्रमुख विक्रम रधवे, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते गुणवंत होळकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास चांदर यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande