
बीड, 18 मे (हिं.स.)। माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून चोरट्यांनी ८० हजार रुपये किमतीची बैलजोडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. मंजरथ येथील शेतकरी रमेश भाऊराव वाघमारे (वय ५४) यांनी त्यांच्या घराशेजारील गोठ्यात बैलजोडी बांधली होती. चोरट्यांनी गोठ्यात प्रवेश करून दोन्ही बैल चोरून नेले. चोरीस गेलेल्या बैलजोडीमध्ये दोन्ही बैल पांढऱ्या रंगाचे असून बैल गोठ्यात नसल्याचे दिसून आल्यानंतर शेतकरी वाघमारे यांनी परिसरात शोध घेतला.
मात्र, बैल मिळून न आल्याने त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रमेश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, तालुक्यातील सादोळा येथील एका शेतकऱ्याच्य गोठ्यातून चोरट्यांच्या टोळीने दोन म्हशी पिकअपमधून चोरून नेताच ग्रामस्थांनी त्यांना किट्टीआडगावजवळ अडवले त्यामुळे शेतकरी प्रल्हाद गायकवाड यांच्या मालकीच्या म्हशी चोरी होण्यापासून वाचल्या. असे असतानाच ही घटना समोर आल्याने जनावर चोर सक्रीय झाल्याची चर्चा होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis