
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मानले परभणीकरांचे आभार
परभणी, 18 मे (हिं.स.)इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि देशहिताचा संदेश देणाऱ्या ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाला परभणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सप्तसूत्रीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वाहने वापरणे टाळून सायकल, पायी प्रवास तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला.
या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणीकरांचे आभार व्यक्त केले. “देशहित, इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी परभणीकरांनी दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे. नागरिकांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद असून, अशाच प्रकारे ‘नो व्हेईकल डे’ला प्रतिसाद द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील विविध भागांमध्ये ‘नो व्हेईकल डे’चा सकारात्मक परिणाम दिसून आला. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. इंधन बचतबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरात पर्यावरणपूरक संदेश पोहोचला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis