अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा
रायगड, 18 मे (हिं.स.)नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे जितेगाव, ता. कर्जत येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. संबंधित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर आरोपीविरुद्ध नेरळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Minor girl raped; Case registered against accused after she became six months pregnant


रायगड, 18 मे (हिं.स.)नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे जितेगाव, ता. कर्जत येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. संबंधित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर आरोपीविरुद्ध नेरळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेगाव येथील आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचे वय माहित असतानाही तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्याशी इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारातून संबंधित मुलगी गर्भवती राहिली असून ती सध्या सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुरनं. 106/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोस्को) 2012 चे कलम 4, 6, 10 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई/प्राची पांगे हे करीत आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande