NEET पेपरफुटी प्रकरण : मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात, विशेष न्यायालयात करणार हजर
लातूर, 18 मे (हिं.स.)। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील संशयित शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने ताब्यात घेतले असून, त्याला आज विशेष न्यायालयात हजर
मोटेगावकर


लातूर, 18 मे (हिं.स.)।

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील संशयित शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने ताब्यात घेतले असून, त्याला आज विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी क्रूर खेळ करणाऱ्या या रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सीबीआयने कसून तपास सुरू केला आहे. लातूर कनेक्शनच्या चौकशीदरम्यान मोटेगावकर याचे नाव समोर आले होते. या कारवाईमुळे पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे सीबीआयला शक्य होणार असून, आगामी चौकशीतून अनेक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी न्यायालयीन कोठडीनंतर सीबीआय तपासाची पुढील दिशा निश्चित करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande