
परभणी, 18 मे (हिं.स.)परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमजम कॉलनीत एका दुचाकीवरुन आलेल्या वाहनधारकाने दुसऱ्या वाहनधारकाला हात दाखवून थांबवून चाकूचा भोसकून सुमारे साडेसहा हजार रुपयांची रोख रक्कम पळविली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
शेख मोहसीन हे दुचाकीवरुन येत असतांना त्यांना हात दाखवून एका वाहनधारकाने थांबण्यास भाग पाडले अन् तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते दे असे दर्डावले. रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर दुचाकीवरील दोघापैकी एकाने पाठीत चाकू भोसकून साडेसहा हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. दरम्यान, या प्रकरणात शेख मोहसीन यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नानलपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis