
नीट पेपरफूट आणि दरवाढीचा नोंदवला निषेध
सोलापूर, 18 मे (हिं.स.) : पेट्रोल व डिझेल दरवाढ, नीट पेपर लीक प्रकरण तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने भाजप कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करत केंद्र सरकार आणि पालकमंत्री गोरे यांचा निषेध केला.
या आंदोलनादरम्यान नीट पेपर लीक प्रकरणामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच पालकमंत्री गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन रोखून सहभागी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले की, देशात भाजप सरकार आल्यापासून शिक्षण व्यवस्थेची स्थिती चिंताजनक झाली असून नीट परीक्षेचे पेपर वारंवार लीक झाल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होत असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे आणि अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडल्याचेही नमूद केले. तसेच 23 लाख विद्यार्थी व त्यांच्या पालकांची सरकारने माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड