
नांदेड, 18 मे (हिं.स.) : डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेड महानगर येथे आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान 2026’ अंतर्गत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण वर्गाला संबोधित केले.
भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा विस्तार करण्यासाठी तसेच संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास राम पाटील रातोळीकर, अमरनाथ राजुरकर, चैतन्य बापू देशमुख तसेच कविता संतोष मुळे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रशिक्षण महाभियानाच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाजासाठी अधिक सक्षम करणे हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis