
पुणे, 18 मे (हिं.स.)।पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी असंतोष व्यक्त केला जात आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुण्यात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वतीने या दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेपर्यंत बैलगाडी आणि टांगा मोर्चा काढण्यात आला.या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत वाढती महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध केला. नागरिकांवरील वाढत्या आर्थिक ताणाबाबतही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु