भाजप नेते केनेकर यांच्या कार्यालयास पाथरी नगराध्यक्षांची भेट
छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आसेफ खान यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भाजपचे नेते तथा माजी आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांचा सन्
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.)।

परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आसेफ खान यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भाजपचे नेते तथा माजी आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. भेटीदरम्यान विविध सामाजिक, विकासात्मक तसेच जनहिताच्या विषयांवर सकारात्मक व विधायक चर्चा झाली.

समाजहित आणि विकासाभिमुख उपक्रमांना अधिक गती मिळावी, या दृष्टीने परस्पर सहकार्य व संवाद महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande