धार्मिक कार्यक्रम समाजात एकता आणि संस्कार दृढ करतात : अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.) : धार्मिक कार्यक्रम समाजात एकता, संस्कार आणि सकारात्मकतेची भावना अधिक दृढ करतात, असे मत राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगर येथील देवळाई परिसरात आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 मे (हिं.स.) : धार्मिक कार्यक्रम समाजात एकता, संस्कार आणि सकारात्मकतेची भावना अधिक दृढ करतात, असे मत राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगर येथील देवळाई परिसरात आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी परम पूज्य डॉ. पंडित भवानी शंकरजी तिवारी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

या सोहळ्यात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात श्रीमद् भागवत कथेचे अमृतमय निरूपण करण्यात आले. महाराजांच्या रसाळ प्रवचनातून अध्यात्म, संस्कार आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश उपस्थित भाविकांना मिळाला.

कार्यक्रमादरम्यान धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. उपस्थितांनीही या आयोजनाचे कौतुक केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande