सोलापूर: हजेरी भत्ता व वैद्यकीय बिले तातडीने देण्याची एस.टी. कर्मचाऱ्यांची मागणी
सोलापूर, 18 मे (हिं.स.)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) चालक आणि वाहकांना विविध भत्ते व वैद्यकीय बिलांची थकबाकी मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. हजेरी प्रोत्साहन भत्ता, शिलाई भत्ता तसेच वै
st


सोलापूर, 18 मे (हिं.स.)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) चालक आणि वाहकांना विविध भत्ते व वैद्यकीय बिलांची थकबाकी मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. हजेरी प्रोत्साहन भत्ता, शिलाई भत्ता तसेच वैद्यकीय बिलांची थकीत रक्कम तातडीने अदा करावी, या मागणीसाठी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने सोलापूर विभाग नियंत्रकांना निवेदन दिले आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांतील सण-उत्सव, यात्रा आणि लग्नसराईच्या गर्दीच्या काळात एस.टी. कर्मचाऱ्यांनी कोणतीही रजा न घेता प्रवाशांची सेवा सुरळीत ठेवण्यासाठी काम केले. वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांनी महामंडळाच्या हितासाठी सेवा बजावली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पण, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या भत्त्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या निवेदनाच्या प्रती कामगार अधिकारी (राज्य परिवहन, सोलापूर) तसेच सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. आता सोलापूर विभाग प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि थकीत रक्कम कधी अदा केली जाते, याकडे एस.टी. कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande