सोलापूर शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब; हृदयरुग्णांना मोठा दिलासा
सोलापूर, 18 मे (हिं.स.) : शासकीय रुग्णालयातील नवीन बी ब्लॉक इमारतीच्या तळमजल्यात आर्थोपेडिक विभागाजवळ हृदयरोग विभाग सुरू करण्यात येत असून अत्याधुनिक कॅथलॅबचे काम वेगाने सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ही सुविधा रुग्णांसाठी खुली होणार
सोलापूर शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब; हृदयरुग्णांना मोठा दिलासा


सोलापूर, 18 मे (हिं.स.) : शासकीय रुग्णालयातील नवीन बी ब्लॉक इमारतीच्या तळमजल्यात आर्थोपेडिक विभागाजवळ हृदयरोग विभाग सुरू करण्यात येत असून अत्याधुनिक कॅथलॅबचे काम वेगाने सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ही सुविधा रुग्णांसाठी खुली होणार आहे.

या कॅथलॅबमुळे एकाच छताखाली हृदयविकाराच्या तपासण्या, उपचार आणि अत्यावस्थ रुग्णांचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गरीब रुग्णांवरील उपचार खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

सध्या शासकीय रुग्णालयातील हृदयरोग विभागात महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत उपचार खासगी रुग्णालयांमध्ये दिले जातात. मात्र नवीन कॅथलॅब सुरू झाल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथे पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या ठिकाणी 10 बेड्ससह आधुनिक ऑपरेशन थिएटर उभारले जात असून आवश्यक यंत्रसामग्री बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कॅथलॅबसाठी उपकरणांची स्थापना सध्या सुरू आहे.

या सुविधेचे लोकार्पण पुढील दीड महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे शहर व जिल्ह्यातील गरीब हृदयरुग्णांना लाखो रुपयांच्या उपचार खर्चातून मोठा दिलासा मिळणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande