सोलापुरात जंगम समाजाचे एकत्रीकरण; जनगणनेवर ठराव
सोलापूर, 18 मे (हिं.स.)। आगामी जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात जंगम समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत समाजातील प्रत्येक सदस्याने जनगणनेत धर्म ‘हिंदू’, जात ‘लिंगायत’ आणि उपजात ‘जंगम’ अशी नोंद करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सोलापूर
grdf


सोलापूर, 18 मे (हिं.स.)।

आगामी जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात जंगम समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत समाजातील प्रत्येक सदस्याने जनगणनेत धर्म ‘हिंदू’, जात ‘लिंगायत’ आणि उपजात ‘जंगम’ अशी नोंद करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सोलापूर शहर व परिसरातून सुमारे ३ हजार जंगम समाजबांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मंदिरात हे समाजएकत्रीकरण आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी शिवाचार्य आणि धर्मगुरूंविषयी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाचा जंगम समाजाकडून निषेध करण्यात आला.

कार्यक्रमाला नागणसूर, मैंदर्गी, वेळापूर, सदाशिव तसेच कडबगाव येथील शिवाचार्य स्वामींसह अनेक संत-महंत उपस्थित होते. हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे चिदानंद मुस्तारे यांनी समाजबांधवांना एकत्र राहण्याचे आवाहन केले.

हिंदू आणि लिंगायत समाजात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande