सोलापूर विधानपरिषद निवडणूक जाहीर; भाजप उमेदवारीवर चर्चांना उधाण
सोलापूर, 18 मे (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या सोलापूर विधानपरिषदेच्या जागेची निवडणूक अखेर जाहीर झाली असून, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही निवडणूक आता प्रत्यक्षात ये
gfd


सोलापूर, 18 मे (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या सोलापूर विधानपरिषदेच्या जागेची निवडणूक अखेर जाहीर झाली असून, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही निवडणूक आता प्रत्यक्षात येत असल्याने विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली आहे.भाजपकडून प्रशांत परिचारक किंवा शशिकांत चव्हाण यांना उमेदवारी मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आवश्यक मतदारसंख्येअभावी ही निवडणूक लांबणीवर पडली होती. मात्र अलीकडे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका पार पडल्याने आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध झाली आणि निवडणूक प्रक्रिया पुढे सरकली आहे.

भाजपमध्ये उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत असली तरी अनुभवी चेहऱ्यांऐवजी नव्या नेतृत्वाला संधी दिल्यास संघटनात्मक मजबुती साधता येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पक्षाकडून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत परिचारक यांनी “मी माझ्या कार्यकर्त्याला कुणाच्याही दावणीला बांधणार नाही,” असे केलेले वक्तव्य पुन्हा चर्चेत आले असून, त्यालाही राजकीय संदर्भ जोडले जात आहेत.-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande