
सोलापूर, 18 मे (हिं.स.) : दौंड–मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्यांच्या मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. या बदलांचा परिणाम सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर झाला असून प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनानुसार गाडी क्रमांक हुबळी–बनारस एक्सप्रेस ही गाडी सोलापूर–कुर्डूवाडी–लातूर रोड–छत्रपती संभाजीनगर–मनमाड या बदललेल्या मार्गाने धावणार आहे.
तसेच गाडी क्रमांक कर्नाटक एक्सप्रेस ही गाडी सोलापूर–कुर्डूवाडी–लातूर रोड–मनमाड या मार्गाने वळविण्यात आली आहे.
या कामामुळे छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर रोड, कुर्डूवाडी आणि सोलापूर या मार्गांवरील प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार आहे. काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल किंवा विलंब होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.
मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सेवा अधिक सक्षम आणि सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड