पुणे–सोलापूर मार्गे धावणार मुंबई–बंगळुरू वंदे भारत स्लीपर
सोलापूर, 18 मे (हिं.स.)। मुंबई–बंगळुरू दरम्यान धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता असून ही गाडी पुणे–सोलापूर मार्गे धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गाला मंजुरी मिळाल्याची चर्चा असून पुढील काही
Vande Bharat news


सोलापूर, 18 मे (हिं.स.)।

मुंबई–बंगळुरू दरम्यान धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता असून ही गाडी पुणे–सोलापूर मार्गे धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गाला मंजुरी मिळाल्याची चर्चा असून पुढील काही महिन्यांत सेवा सुरू होऊ शकते.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, ही ट्रेन मुंबई सीएसएमटी–पुणे–सोलापूर–कलबुर्गी–हुबळी मार्गे बंगळुरूपर्यंत धावू शकते. सध्या मुंबई–बंगळुरू प्रवासासाठी 20 ते 24 तास लागतात; मात्र वंदे भारत स्लीपरमुळे हा प्रवास सुमारे 15 तासांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनीही मुंबई–बंगळुरू मार्गावर नवीन रेल्वे सेवांबाबत संकेत दिले आहेत. काही अहवालांनुसार, ऑगस्ट 2026 पर्यंत या स्लीपर ट्रेनचे संचालन सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र अंतिम वेळापत्रक आणि अधिकृत उद्घाटनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.सोलापूर हे वस्त्रोद्योग, बीडी उद्योग आणि कृषी बाजारपेठेसाठी महत्त्वाचे शहर आहे. वेगवान रेल्वेमुळे मुंबई आणि बंगळुरू या दोन मोठ्या आर्थिक केंद्रांशी संपर्क अधिक मजबूत होईल.पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि सोलापूर परिसरातील धार्मिक पर्यटनाला याचा फायदा होऊ शकतो. दक्षिण भारतातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande