माणगाव-मोर्बा रोडवर भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील चौघे जखमी
रायगड, 18 मे (हिं.स.) : माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे निळगुण गावाजवळ धनसे मैदान परिसरात माणगाव–मोर्बा रोडवर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
## माणगाव-मोर्बा रोडवर भीषण अपघात ; दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघे जखमी  माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे निळगुण गाव हद्दीत धनसे मैदानाजवळ माणगाव-मोर्बा रोडवर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील एक्यूव्ही कार (क्र. एमएच 12 यूएफ 0676) घेऊन श्रीवर्धन-माणगाव रोडने प्रवास करत होते. मौजे निळगुण गाव हद्दीत धनसे मैदानाजवळ आल्यानंतर माणगाव बाजूकडून श्रीवर्धनच्या दिशेने येणारी मोटारसायकल (क्र. एमएच 06 सीए 9426) ही आरोपी चालकाने अतिवेगाने, हयगयीने व बेदरकारपणे चालवत फिर्यादी यांच्या कारच्या समोरील उजव्या टायरजवळ जोरदार धडक दिली.  या अपघातात फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या मांडी व गुडघ्याला दुखापत झाली. तसेच त्यांची पत्नी मिना नितेश जाधव यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली दुखापत झाली. दोन वर्षांची मुलगी नेहा नितेश जाधव हिच्या डाव्या डोळ्याखाली खरचटले असून दोन वर्षांचा मुलगा नयन नितेश जाधव याच्या उजव्या गुडघ्याखाली दुखापत झाली आहे. अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले.  याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुरनं. 142/2026 अन्वये मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 तसेच भा.न्या.स.क. कलम 281, 125 (अ), 125 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहवा जाधव करीत आहेत.


रायगड, 18 मे (हिं.स.) : माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे निळगुण गावाजवळ धनसे मैदान परिसरात माणगाव–मोर्बा रोडवर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील कार (क्र. एमएच 12 यूएफ 0676) घेऊन श्रीवर्धन–माणगाव रोडने प्रवास करत होते. निळगुण गाव हद्दीत धनसे मैदानाजवळ आल्यानंतर माणगावकडून श्रीवर्धनच्या दिशेने येणारी मोटारसायकल (क्र. एमएच 06 सीए 9426) ही आरोपी चालकाने अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवत फिर्यादींच्या कारच्या समोरील उजव्या टायरजवळ जोरदार धडक दिली.

या अपघातात फिर्यादी यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्या पत्नी मिना नितेश जाधव यांच्या उजव्या पायालाही इजा झाली आहे. तसेच दोन वर्षांची मुलगी नेहा नितेश जाधव हिला डोळ्याखाली खरचटले असून, दोन वर्षांचा मुलगा नयन नितेश जाधव याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. अपघातामुळे दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुरनं. 142/2026 अन्वये मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 (अ) व 125 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा जाधव करीत आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande