
आ. अभिमन्यू पवार यांची उपस्थिती: चारशे ते पाचशे लोकांना भोजनदान देत निसर्गप्रेमाचा संदेश
लातूर, 18 मे (हिं.स.)।
: हौसेला मोल नसते सध्या लग्नासाठी मुलांना मुली मिळत नाहीत म्हणून मुलांचे पालक परेशान आहेत. पण कुठलेही काम करायचे म्हटले तर त्या कामासाठी हौस लागते. हौस असेल तर त्या हौसेला मोल नसते. असाच एक आगळा वेगळा आणि चारशे ते पाचशे लोकांना भोजनदान देऊन एक आगळा वेगळा आंब्याचा विवाह सोहळा औसा तालुक्यातील नागरसोगा येथे पार पडला आणि या विवाह सोहळ्याला तालुक्याचे आ. अभिमन्यू पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी व मान्यवरांनी उपस्थिती लावली.
शेती आणि निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी औसा तालुक्यातील नागरसोगा येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या शेतातील आंबा झाडाचा विवाह सोहळा मोठ्या - थाटामाटात साजरा केला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लावलेल्या या झाडांच्या 'लग्नाला' चवक आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थिती लावून शेतकऱ्याचा उत्साह द्विगुणित केला.
निसर्गप्रेमाचा आगळावेगळा उपक्रम
पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरसोगा येथील निसर्गप्रेमी शेतकरी पंडित विश्वनाथ जवळगे यांनी सन २०२२-२३ मध्ये कृषी विभागाच्या योजनेतून आंबा फळबाग लागवड केली होती. या झाडांचे जतन एखाद्या लेकराप्रमाणे केल्यानंतर त्यांनी या आम्र वृक्षाचा शुभ विवाह सोहळा आयोजित केला. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी रीतसर निमंत्रण पत्रिकांचे वाटप करून भोजनाची पण व्यवस्था केली होती.
या अनोख्या विवाह सोहळ्याला
आमदार अभिमन्यू पवार यांनी विशेष वेळ काढून उपस्थिती लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्याने झाडांवर लेकरा सारखं प्रेम करणं ही आपली संस्कृती आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल, तर केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता कमी पाण्याच्या रेशीम शेती आणि केशर आंबा लागवडीसारख्या फळ बागांकडे वळणे काळाची गरज आहे. असे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले
औसा तालुका कृषि अधिकारी
दत्तात्रय हाके यावेळी बोलताना म्हणाले कि तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी यांनी रेशिम शेती व केशर आंबा लागवड करावी ऊस शेती सोडून फळबाग लागवड करावी औसा तालुक्यातील द्राक्ष शेतकरी यांनी जवळपास 50 कोटी रूची द्राक्षे युरोपियन देशात निर्यात केली असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच सौ. सरोजा भास्कर सूर्यवंशी संतोषप्पा मुक्ता उपसरपंच बंडू मसलकर तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय हाके, मंडळ कृषी अधिकारी आर. डी. रेवशेट्टे, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती एम. एम. घायाळ. ग्रामपंचायत सदस्य भास्कर सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी. सुनील जवळगे, अतुल पाटील, चेअरमन यशवंतराव शिंदे, दिपक चाबुकस्वार यांची उपस्थिती होती.
नागरसोगा गावातील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. झाडाप्रती असलेल्या या जिव्हाळ्याच्या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत असून, कृषी विभागाच्या योजनांचा लाभघेऊन शेतकरी कशाप्रकारे प्रगती करू शकतो, याचे उदाहरणच पंडित जवळगे यांनी शेतकऱ्यां समोर ठेवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis