राजकीय वाद रंगला; उमेश पाटलांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर
सोलापूर, 18 मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्यावर कठोर शब्दांत निशाणा साधला आहे. “आम्ही खासदार पार्थ पवार यांच्यासोब
evm


सोलापूर, 18 मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्यावर कठोर शब्दांत निशाणा साधला आहे.

“आम्ही खासदार पार्थ पवार यांच्यासोबत काम करतोय, कुणीही हलक्या कानाचे नाही. रोहित पवारांचा स्वभाव कसा आहे हे बारामतीकरांसह त्यांच्या मतदारसंघातील लोकांना चांगले माहिती आहे,” असे उमेश पाटील म्हणाले.

त्यांनी पुढे आरोप करत म्हटले की, रोहित पवार कार्यकर्त्यांना थेट भेट देत नाहीत आणि त्यांच्या भोवती मोठ्या प्रमाणात पीएंचा वेढा असतो. “त्यांच्या पीएंच्या फिल्टरमधूनच कार्यकर्त्यांची भेट होते,” असा दावाही त्यांनी केला.

याउलट पार्थ पवार यांच्या बाबतीत कोणताही कार्यकर्ता थेट संपर्क साधू शकतो, असेही त्यांनी सांगितले. मात्र रोहित पवारांना थेट फोन केल्यास शिव्या दिल्या जातात, त्यामुळे त्यांनी आपला स्वभाव बदलण्याची गरज असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, विकासकामांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, खासदार झाल्यानंतर पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रशासकीय कामांबाबत चर्चा केली आहे. तसेच 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी नमूद केले. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला असून हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande