बीड : पक्षी व वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था
बीड, 18 मे (हिं.स.) : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्षी आणि वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कायाकल्प फाउंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनासोबतच पक्षी व वन्य प्राण्यांसाठी
बीड : पक्षी व वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था


बीड, 18 मे (हिं.स.) : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्षी आणि वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कायाकल्प फाउंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनासोबतच पक्षी व वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.

धारूर येथील पोलीस स्टेशनच्या पाठीमागील वैकुंठभूमी परिसरात फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी पानवटे तयार केले आहेत. या उपक्रमातून ‘टाकाऊपासून टिकाऊ’ हा संदेश देण्यात आला असून फुटलेले ड्रम, खापरी मडकी, वापरात नसलेल्या पाण्याच्या टाक्या तसेच लोखंडी पत्र्याचे डबे यांचा पुनर्वापर करण्यात आला आहे.

याशिवाय मोठ्या सिमेंट टाक्यांचा उपयोग करून वन्य प्राण्यांसाठीही पाण्याची सोय करण्यात आली आहे. परिसरातील वृक्ष संवर्धन, झाडांना पाणी देणे, स्वच्छता राखणे आणि हिरवाई टिकवून ठेवण्यासाठीही नियमित प्रयत्न सुरू असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.

वाढत्या उष्णतेमध्ये पक्षी आणि मुक्या प्राण्यांना पाण्याचा आधार मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande