
रत्नागिरी, 18 मे (हिं.स.) । आंबव (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने पॉलिटेक्निकमध्ये मंगळवारी, दि. १९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच वेळी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष करियर मार्गदर्शन सत्र होणार आहे.
या सत्रात दहावीनंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची माहिती, करियरच्या विविध संधी व योग्य शाखा निवडीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
आपल्या शाळेतील जास्तीत जास्त दहावीच्या विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन सत्रास पाठवावे. असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी परिसरातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य करियर दिशा मिळावी, या उद्देशाने संस्थेतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी