औषध विक्रेत्यांच्या संपाबाबत नागरिकांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 19 मे (हिं.स.)।अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने दि. २० मे, २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. या संपामध्ये संघटनेचे सभासदांनी सहभागी होवू नये याबाबत त्यांना पत्राद्वार
औषध विक्रेत्यांच्या संपाबाबत नागरिकांना आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 19 मे (हिं.स.)।अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने दि. २० मे, २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. या संपामध्ये संघटनेचे सभासदांनी सहभागी होवू नये याबाबत त्यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. तथापि, नियमित औषधांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करून ठेवावा. संपाच्या कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास किंवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (औषधे) श्री. जी. डी. जाधव (83790 16068) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जी.डी. जाधव सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषधा प्रशासन यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande