नांदेड - मुखेड येथे भाजपा 'एस.आय.आर.' प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
नांदेड, 19 मे, (हिं.स.)। भाजपा जनसंपर्क कार्यालय, मुखेड येथे ''एस.आय.आर. (SIR) प्रशिक्षण कार्यशाळा'' अत्यंत यशस्वीरित्या आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. आगामी संघटनात्मक बांधणी आणि आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथ स्तरावर
अ


नांदेड, 19 मे, (हिं.स.)। भाजपा जनसंपर्क कार्यालय, मुखेड येथे 'एस.आय.आर. (SIR) प्रशिक्षण कार्यशाळा' अत्यंत यशस्वीरित्या आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. आगामी संघटनात्मक बांधणी आणि आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथ स्तरावर पक्षाची यंत्रणा अधिक अचूक व गतिमान करण्यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोनलेवाड हे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नांदेड जिल्हा समन्वयक अतुलजी मंडलिक आणि विधानसभा प्रमुख शिवाजी राठोड यांनी 'मायक्रो-मॅनेजमेंट' आणि तांत्रिक मुद्द्यांवर अत्यंत सविस्तरपणे प्रकाश टाकला व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत प्रामुख्याने खालील विषयांवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले :-

आपल्या स्वतःच्या बूथवरील प्रत्येक मतदाराचे 100% अचूक मॅपिंग करणे.

मतदार यादीतील दुबार (Double) नावे अचूकपणे शोधून ती नियमानुसार यादीतून कमी करणे.

कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा इतर कारणांमुळे स्थलांतर झालेल्या मतदारांच्या याद्यांची सखोल तपासणी करणे.

या प्रशिक्षण शिबिरास किशोरसिंह चौहान, उत्तमराव चव्हाण, मंडळाध्यक्ष बालाजी पाटील सकनुरकर, मंडळाध्यक्ष हेमंतराव खंकरे, हनमंत नरोटे, गणेश पाटील, दत्ता पाटील बेटमोगरेकर, सुधीर चव्हाण, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आणि बीएलए-2 सहकारी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षसंघटन तळागाळात नेण्यासाठी आणि मतदार याद्या पूर्णपणे निर्दोष करण्यासाठी उपस्थित सर्व सहकाऱ्यांनी दाखवलेला हा उत्साह आणि निष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande