रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांची राजापूरला भेट
रत्नागिरी, 19 मे (हिं.स.) । भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी राजापूरला सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रथम श
राजापूरचे नगरसेवक सिद्धांत जाधव यांचे अभिनंदन करताना भीमराव आंबेडकर, सोबत पदाधिकारी


रत्नागिरी, 19 मे (हिं.स.) । भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी राजापूरला सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जाऊन पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आनंद युवक मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव यांनी भीमराव यशवंत आंबेडकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिवाजी बोराडे गुरुजी व लेणी संवर्धन युनिटचे विनय जाधव यांचाही सन्मान करण्यात आला.

राजापुरातील बौद्ध समाजाचे प्रथम नवनिर्वाचित नगरसेवक सिद्धांत जाधव यांचा विशेष सत्कार भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या दौऱ्याचे नियोजन आणि कार्यक्रमांचे आयोजन विनय कुंभवडेकर यांनी केले. कार्यक्रमास अनंत कांबळे, बौद्धाचारी महेंद्र पवार, सत्यजित जाधव, संदेश जाधव आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande