छ. संभाजीनगर - सिल्लोड येथे आरोग्य व शिक्षण विभागाची तालुकास्तरीय बैठक
छत्रपती संभाजीनगर, 19 मे, (हिं.स.)। पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे आरोग्य व शिक्षण विभागाची तालुकास्तरीय बैठक जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती अनिता ज्ञानेश्वर मोठे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांच्या प्रमुख उपस
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 मे, (हिं.स.)। पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे आरोग्य व शिक्षण विभागाची तालुकास्तरीय बैठक जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती अनिता ज्ञानेश्वर मोठे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन वाघ, पंचायत समिती सदस्य अनिल खरात, पंचायत समिती सदस्य अंकुश कोठाळे, पंचायत समिती सदस्या सौ. अनुराधाताई गवळे, माजी पंचायत समिती सदस्य किशोर गवळे, माजी सरपंच सारंग जैवळ,निल्लोड सरपंच उत्तम शिंदे,अमोल शेजुळ, रुषिधंर शिंदे आदींसह आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील आरोग्य व शिक्षण विभागाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande