डिझेल दरवाढीचा फटका; नेरळ–माथेरान टॅक्सी भाड्यात वाढ
रायगड, 19 मे (हिं.स.) : माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशावर आता अधिक भार पडणार असून नेरळ–माथेरान टॅक्सी चालक संघटनेने तब्बल सात वर्षांनंतर भाडेवाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नव्या दर
Diesel price hike hits; Neral-Matheran taxi fares increase


Diesel price hike hits; Neral-Matheran taxi fares increase


रायगड, 19 मे (हिं.स.) : माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशावर आता अधिक भार पडणार असून नेरळ–माथेरान टॅक्सी चालक संघटनेने तब्बल सात वर्षांनंतर भाडेवाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

नव्या दरानुसार प्रति प्रवासी भाडे 100 रुपयांवरून थेट 120 रुपये करण्यात आले आहे. तर लहान मुलांसाठीही वाढीव दरानुसार 20 रुपये आकारले जाणार आहेत. तसेच फुल टॅक्सीचे भाडे 600 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

माथेरान हे राज्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्याने दरवर्षी लाखो पर्यटक नेरळमार्गे येथे भेट देतात. नेरळ–माथेरान घाटरस्त्यावर सुमारे 320 टॅक्सी सेवा कार्यरत असून दररोज हजारो प्रवासी या सेवांचा वापर करतात.

टॅक्सी संघटनेच्या मते, डिझेलचे वाढते दर, वाहन देखभाल खर्च, विमा, आरटीओ शुल्क आणि स्पेअर पार्ट्सच्या किमती वाढल्यामुळे भाडेवाढ आवश्यक होती. कोरोना काळानंतर झालेल्या आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच भाडेवाढ जाहीर झाल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “माथेरानचा प्रवास दिवसेंदिवस महाग होत आहे,” अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली आहे. तर चालक संघटनेने मात्र हा निर्णय न्याय्य असल्याचे म्हटले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande