
खासदार गोपछडे यांच्या उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्र्यांची बैठक
नांदेड, 19 मे (हिं.स.) : भाजपाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा परिसरातील आकाशवाणी व FM नेटवर्कच्या विस्तारासंदर्भात नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत नांदेड आणि देगलूर परिसरातील आकाशवाणीच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी नांदेड आकाशवाणी केंद्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याची तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे सायंकाळचे स्वतंत्र कार्यक्रम पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नांदेड येथील FM केंद्राची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव होता. संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह देगलूर परिसराला दर्जेदार रेडिओ नेटवर्कचा लाभ मिळावा यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत FM केंद्राची क्षमता वाढवून संपूर्ण जिल्हा कव्हर करण्याचे आश्वासन दिले.या निर्णयामुळे ग्रामीण भागातील श्रोत्यांना अधिक दर्जेदार रेडिओ सेवा उपलब्ध होणार असून स्थानिक कलाकारांनाही मोठ्या प्रमाणात संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis