नाशिक - बागलाण तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा दोन तास ठिय्या
-कांद्याला प्रतिक्विंटल २००० रुपये हमीभाव देण्याची मागणी नाशिक, 19 मे, (हिं.स.) - बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कांद्याला प्रतिक्विंटल २००० रुपये हमीभाव देण्यासह विविध मागण्यांसाठी बागलाण तहसील कार्यालयात रयत क्रांती संघटनेचे
नाशिक - बागलाण तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा दोन तास ठिय्या


-कांद्याला प्रतिक्विंटल २००० रुपये हमीभाव देण्याची मागणी

नाशिक, 19 मे, (हिं.स.) - बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कांद्याला प्रतिक्विंटल २००० रुपये हमीभाव देण्यासह विविध मागण्यांसाठी बागलाण तहसील कार्यालयात रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास चावडे यांच्या दालनात दोन तास एकाच जागेवर बसून आंदोलन केले.

यंदा बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे. मात्र उत्पादन खर्चही निघत नाही इतका कवडीमोल भावाने कांदा विकला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२३५ रुपये भाव जाहीर केला आहे, मात्र प्रत्यक्षात कुठेही खरेदी झाली नाही. यात ठराविक नाफेडच्या दलालांचा फायदा होण्याची शक्यता आहे. कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. कमी भावात विक्री झालेला कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्यात यावे. तालुक्यातील सटाणा व नामपुर येथील बाजार समिती शेतमाल विक्री झाल्यावर दिल्या पावत्या कच्च्या असतात. यापुढे कॉम्पुटर टाईप असलेल्या पक्क्या पावत्या देण्यात याव्यात. मागील थकलेली पीकविमा भरपाई तत्काळ देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार चावडे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांना देण्यात आले. तहसीलदार कैलास चावडे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande