माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांना मातृशोक; कमलबाई दोडतले यांचे निधन
बीड, 19 मे (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या मातोश्री कमलबाई प्रभाकर दोडतले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे दोडतले कुटुं
अ


बीड, 19 मे (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या मातोश्री कमलबाई प्रभाकर दोडतले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे दोडतले कुटुंबावर आणि चतुरवाडी परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.

दिवंगत कमलबाई दोडतले यांच्या पार्थिवावर अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथील त्यांच्या खाजगी शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी अंबाजोगाई आणि परिसरातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दोडतले कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande