सौर कृषी पंपाच्या एनओसीसाठी लाच घेणारा महावितरणचा तंत्रज्ञ बीड एसीबीच्या जाळ्यात
बीड, 19 मे, (हिं.स.) - शेतकऱ्याला सौर कृषी पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली
सौर कृषी पंपाच्या एनओसीसाठी लाच घेणारा महावितरणचा तंत्रज्ञ बीड एसीबीच्या जाळ्यात


बीड, 19 मे, (हिं.स.) - शेतकऱ्याला सौर कृषी पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तो तेलगाव येथील महावितरण कार्यालयात कार्यरत आहे.

एका शेतकऱ्याने सौर कृषी पंपाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, मात्र याने पैशांची मागणी केल्याने शेतकऱ्याने बीड एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा करून पथकाने चिंचोली परिसरात सापळा रचला आणि लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सोपान चित्तमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान कवडे, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश गवळी आणि गणेश मेहत्रे यांच्या पथकाने केली. हक्काच्या प्रमाणपत्रासाठी गरीब शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या या भ्रष्ट त्रासामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande