
परभणी, 19 मे (हिं.स.)। भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या “ज्ञानभारतम” प्रकल्पांतर्गत हस्तलिखीत सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेबाबत परभणी तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडली.
भारतामध्ये अनेक ठिकाणी जुनी हस्तलिखीते उपलब्ध असून त्यांचे जतन, संवर्धन व डिजिटायझेशन करण्यासाठी केंद्र शासनाने हा प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी “Gyan Bharatam” हे मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे.मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था तसेच खाजगी संग्रहालयांमधील हस्तलिखीतांची माहिती या मोहिमेत संकलित करण्यात येणार आहे.बैठकीत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मधुकर क्षिरसागर यांनी प्रकल्पाची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis