विधान परिषद निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात आचारसंहिता लागू
रत्नागिरी, 19 मे (हिं.स.) । भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरिता निवडणूक जाहीर केल्याने रत्नागिरी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम काल, दि. 18 मे 2026
विधान परिषद निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात आचारसंहिता लागू


रत्नागिरी, 19 मे (हिं.स.) । भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरिता निवडणूक जाहीर केल्याने रत्नागिरी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम काल, दि. 18 मे 2026 रोजी जाहीर झाला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 18 मे 2026 पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 जून 2026 पर्यंत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. सार्वजनिक व खासगी मालमत्तेवर फलक, बॅनर लावून मालमत्ता विद्रूप केल्यास अगर तशी तक्रार आल्यास मालमत्ता विरूपीकरण कायदा 1995 चे कलम 2 नुसार दंडनीय कारवाई करावी लागेल, असे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

या निवडणुकीसाठी 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 असेल. मंगळवार 2 जून 2026 रोजी अर्जांची छाननी होणार असून गुरुवार 4 जून 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतमोजणी 22 जून 2026 रोजी करण्यात येईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande