नांदेड महानगर प्रशिक्षण अभ्यासवर्गाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड, 19 मे (हिं.स.)पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत नांदेड येथील “सेवन स्विस रिसॉर्ट ” मध्ये आयोजित नांदेड महानगर प्रशिक्षण अभ्यासवर्गाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशिक्षण अभ्यासवर्गाचा पहिला व दुसरा दि
Q


नांदेड, 19 मे (हिं.स.)पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत नांदेड येथील “सेवन स्विस रिसॉर्ट ” मध्ये आयोजित नांदेड महानगर प्रशिक्षण अभ्यासवर्गाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रशिक्षण अभ्यासवर्गाचा पहिला व दुसरा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि याचसोबत या दोन दिवसीय प्रशिक्षण अभ्यासवर्गाचा यशस्वी समारोप झाला.!

भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रसेवा आणि समाजकार्यासाठी समर्पित विचारप्रवाह आहे. त्या विचारांना अधिक सक्षमपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना वैचारिक, संघटनात्मक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या प्रशिक्षण अभ्यासवर्गाच्या माध्यमातून करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande