पुणे : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणाची २१ मेपासून रोज सुनावणी
पुणे, 19 मे, (हिं.स.) - नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग येणार आहे. राज्यभर संतापाची लाट उसळवणाऱ्या या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी येत्या २१ मेपासून विशेष न्यायालयात सुरू होणार असून
पुणे : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणाची २१ मेपासून रोज सुनावणी


पुणे, 19 मे, (हिं.स.) - नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग येणार आहे. राज्यभर संतापाची लाट उसळवणाऱ्या या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी येत्या २१ मेपासून विशेष न्यायालयात सुरू होणार असून, खटल्याची रोजच्या रोज सुनावणी घेत जलदगतीने प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील आजय मिसरे यांनी दिली.

या धक्कादायक घटनेनंतर राज्य शासनाने खटल्याची प्रभावी मांडणी करण्यासाठी ऍड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. २००० सालापासून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून काम करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये काम पाहिले आहे. या प्रकरणात त्यांना ऍड. सुरेश गायकवाड आणि ऍड. प्रमेश शिगणे हे सहकार्य करणार आहेत. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. घटनास्थळ पंचनामे, साक्षीदारांचे जबाब, न्यायालयीन अधिकाऱ्यांसमोरील नोंदी, सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक आणि रासायनिक पुरावे मोठ्या प्रमाणावर जमा करण्यात आले आहेत.तपास यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुरावे संकलित केले असून, न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सुनावणी जलदगतीने पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande